करोना बचाव नियम

करोना बचाव नियम कोणते ?

करोना बचाव नियम
करोना बचाव नियम

करोना बचाव नियम कोणते ?

जरी ह्या वर्षी कॉविड चा प्रकार बदल ला तरी नियम तेच . पण खूप जास्त काटेकोर पणे पाळावे परत एकदा त्या नियमांची पुनरावृत्ती करू या

नियम 1

अगदी अतिकटीची वेळ आल्याशिवाय आपल्या घर बाहेर निघू नका .

नियम 2

अत्यंत बिकट कारणामुळे घराबाहेर निघावे लागलेच तर आधी मास्क घाला व मग बाहेर निघा . शक्य असेल तर डोळ्यावर चष्मा सुध्धा घाला .मास्क ने तोंड आणि नाक दोन्ही व्यवस्थित झाकले गेले पाहिजे . रस्त्यात कोणी ओळखीचं भेटले तर 6 फूट दुरून नमस्कार करा . जवळ जाऊ नका . बोलण्यासाठी मास्क सारकावू नाका.

नियम 3

चालताना बोलताना चेहऱ्याला स्पर्श करू नका . जेथे कामासाठी गेलात तेथे 6 फूट अंतर ठेवा. विनाकारण कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका .

नियम 4

परत आल्यावर आधी हाथ सवछ साबणाने धुवा नंतर मास्क काढून धुवायला टाका आणि परत हाथ धुवा . कपडे बदला . शक्य असेल तर स्नान करा

ह्या नियमामुळे कसा बचाव होतो ?

ह्या प्रश्नाचे उत्तर समजण्या साठी कॉविड कसा होतो हे समजणे आवश्यक. कॉविड हा त्या रोगाचा विशानु आपल्या शरीरात शिरल्या मुले होतो. तो विषाणू आपल्या शरीरात आपले तोंड ,नाक आणि डोळे ह्या मार्फत शिरू शकतो. हा विषाणू एरव्ही असतो तरी कोठे . कॉविड पेशंट च्य भोवताली असलेल्या हवेत हा विषाणू दूर दूर पर्यंत पसरलेला असतो . शिवाय कॉविड पेशंट ने स्पर्श केलेल्या वस्तूवर सुध्धा असू शकतो म्हणजे त्याची भांडी खुर्ची अंथरून वगैरे आता विचार करा आपण बाहेर सतत मास्क घालून राहिलो, 6 फूट अंतर ठेवले आणि आल्यावर हात स्वच्छ धुतले आणि हे नियम काटेकोरपणे पळाले तर तो विषाणू आपल्या शरीरात जाऊ शकतो का ? नाही . आणि आपण विनाकारण बाहेरच्या वस्तू ना स्पर्श न केला तर तो आपल्या हाथवर येऊ शकतो का नाही . आणि आपण हाथ स्वच्छ धुतले साबणाने तर हाताला विषाणू लागला असेल तरी त्याच नाश होईल .

पटत आहे ना ?