करोना आहार नियमन

करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे?

करोना आहार नियमन
करोना आहार नियमन

करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे?

या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर म्हणजे चागली जीवन शैली अवलाम्बुन स्वतः ची रोग प्रतिकारक शक्ती सातत्याने उच्च पातळीवर ठेवणे . 

चांगला आहार

  • आहारात हिरवी पाले भाजी , ईतर भाज्या ,सलाड चे साहित्य , फळ , वरण ,मोड आलेले धन्य ह्यांचा हमखास समावेश करावा . विटामिन सी चे आता विशेष महात्वे. त्यासाठी लिंबू चा भरपूर वापर आणि आवळा , पेरू, मोसंबी, संत्री ह्यापैके जी फळे मिळतील त्यांचा वापर. 
  • विटामिन डी फुकटात मिळते – रोज जर २० मिनिट सूर्यप्रकाशात थांबलात तर ! सकाळ ची १० ते ११ ही सर्वोत्तम वेळ . ह्यावेळी हाथ पाय आणि शरीराच्या जास्तीत जास्त भागावर सूर्य किरण पडले पाहिजेत असा प्रयत्न करावा.
  • या शिवाय विटामिन B, झिंक हे सुध्धा महत्वाचे घटक  शरीरात जायला हवे .कड धान्ये , तेल बिया ( तील , शेंगदाणे इ), ताजे दही, ताक  इ यांचे नियमित सेवन केल्याने हे घटक आपल्याला मिळू शकतात. जर वरील काहीच शक्य नसेल तर ह्या सर्व विटामिन च्या गोळ्या पण केमिस्ट कडे मिळतात. त्याकडून घेऊन वापर समजावून घ्याव्यात

व्यायाम

  • नियमित थोडे  व्यायाम आणि थोडे प्राणायाम करणे.
  • योगासने आणि ईतर व्यायाम व प्राणायाम ह्यावर यु ट्यूब वर बरच मार्गदर्शन उपलब्ध आहे

हे न चुकता घरातल्या प्रत्येक सदस्याने करावे . 

Powered by
GaavKhoj App
https://www.GaavKhoj.com/App