
करोना आहार नियमन
करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे?
या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर म्हणजे चागली जीवन शैली अवलाम्बुन स्वतः ची रोग प्रतिकारक शक्ती सातत्याने उच्च पातळीवर ठेवणे .
चांगला आहार
- आहारात हिरवी पाले भाजी , ईतर भाज्या ,सलाड चे साहित्य , फळ , वरण ,मोड आलेले धन्य ह्यांचा हमखास समावेश करावा . विटामिन सी चे आता विशेष महात्वे. त्यासाठी लिंबू चा भरपूर वापर आणि आवळा , पेरू, मोसंबी, संत्री ह्यापैके जी फळे मिळतील त्यांचा वापर.
- विटामिन डी फुकटात मिळते – रोज जर २० मिनिट सूर्यप्रकाशात थांबलात तर ! सकाळ ची १० ते ११ ही सर्वोत्तम वेळ . ह्यावेळी हाथ पाय आणि शरीराच्या जास्तीत जास्त भागावर सूर्य किरण पडले पाहिजेत असा प्रयत्न करावा.
- या शिवाय विटामिन B, झिंक हे सुध्धा महत्वाचे घटक शरीरात जायला हवे .कड धान्ये , तेल बिया ( तील , शेंगदाणे इ), ताजे दही, ताक इ यांचे नियमित सेवन केल्याने हे घटक आपल्याला मिळू शकतात. जर वरील काहीच शक्य नसेल तर ह्या सर्व विटामिन च्या गोळ्या पण केमिस्ट कडे मिळतात. त्याकडून घेऊन वापर समजावून घ्याव्यात
व्यायाम
- नियमित थोडे व्यायाम आणि थोडे प्राणायाम करणे.
- योगासने आणि ईतर व्यायाम व प्राणायाम ह्यावर यु ट्यूब वर बरच मार्गदर्शन उपलब्ध आहे
हे न चुकता घरातल्या प्रत्येक सदस्याने करावे .
Powered by
GaavKhoj App
https://www.GaavKhoj.com/App
Leave a reply
You must be logged in to post a comment.